local train ladies coach logo (Photo Credits: File Image)

मुंबईची लाईफलाईन ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये दिवसाला हजरोंपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. त्यामध्ये लोकल काही कारणामुळे उशिराने आल्यास त्यामध्ये प्रचंड गर्दीची स्थिती निर्माण होते. पर्यायी या समस्येचा सामना बहुधा वृद्ध, अपंग व्यक्ती किंवा गर्भवती महिलांना (Pregnant Women) करावा लागतो. त्यामुळेच आता गर्भवती महिलांना लोकलमध्ये दिव्यांगांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या डब्यातून प्रवास करता येणार आहे. यासाठी आता रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली असून याबद्दल अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी याबद्दल मागणी केली होती.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था करण्यात यावी याबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो. त्यातच गर्भवती महिलांना सामान्य डब्यांतून प्रवास करताना अडथळा निर्माण होतो याची चिंता अमित ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे गर्भवती महिलांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच लोकलच्या डब्यातील लावण्यात आलेले काही सीसीटीव्ही कार्यरत नसल्याचे ही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.(चिपळूण शहरात पुराच्या पाण्यातून वाहत आली मगर, नागरिकांची उडाली तारांबळ; वन अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळली मोठी हानी (Video)

तर सध्या पावसाचे दिवस असून लोकल उशिराने आल्यास प्रवाशांची गर्दी रेल्वेस्थानकात दिसून येते. त्यामुळे या समस्येवर काहीतरी तोडगा काढावा असे सुद्धा मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्याचसोबत लोकलमध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी असे सुद्धा अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.