Viral Video: एका रिक्षा चालकाचा रिक्षा चालवतांना मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहतांना दिसत आहे. प्रवाशाचा जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री मंजिरी ओकने पोस्ट केला असून तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तिने सांगितले आहे. अभिनेत्री मंजिरी ओकने कमेंटमध्ये सांगितले की" पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन , असा प्रवास का करायचा ? आणि ह्यावर ह्यांना काही बोलायच नाही . कारण ह्यांचीच अरेरावी ऐकून घेयला लागेल .दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली ..आणि तरी ही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन पण मी रिक्षा चालवताना असा फ़ोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांनी मला…एकूणच कठीण आहे सगळं..देव त्याला अक्कल देवो" असे कमेंट मध्ये सांगितले आहे.
येथे पाहा, रिक्षा चालकाचा व्हिडीओ:
View this post on Instagram
दरम्यान, अनेकांनी व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ मुंबईचा असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, त्या रिक्षा चालकावर कारवाई करण्यात आली आहे का? याबद्दल संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.