नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली गेल्यामुळे मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. नाशिकमध्ये आजपासून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी दूरवरून नागरिक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व नागरिक जवळच असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. या सर्व पाार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा - Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी; सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे)
नाशिकच्या पाथर्डी गावाजवळील दोंदेमळालगत असलेल्या भवानी माथा येथे शिवमहापुराण कथा 21 ते 25 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या कथेचे आयोजन हे करण्यात आले आहे. या कथेसाठी येणार भाविक हा जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याने मंदिरात गर्दी होण्याची शक्यता आहे.
शिवमहापुराण कथा व त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी वाढणार आहे. येथे येणाऱ्या भाविकांना व्हीआयपी दर्शनामुळे त्रास होऊ नये; यासाठी देवस्थान प्रशासनाने निर्णय घेत 27 नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.