Dhule: किरकोळ कारणांवरून धुळ्यात दोन गटात जबर हाणामारी, एकाचा मृत्यू तर 5 जण अटकेत
Dead Body | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

धुळे (Dhule) जिल्ह्यातील एका गावात रविवारी दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर हत्येच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुनाफ गफ्फार मनियार असे मृताचे नाव आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या भागात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.पोलीस अधीक्षक (धुळे) प्रवीणकुमार पाटील म्हणाले, हत्येप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा MSRTC Bus Accident Indore: एमएसआरटीसी बसला मध्य प्रदेशमध्ये अपघात, पुलाचा कठडा तोडून बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू, 15 जण बेपत्ता

या घटनेची माहिती मिळताच धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.