यंदा दहावीचा निकाल मागील 13 वर्षांमधील निराशाजनक लागला आहे. परिणामी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अकरावी प्रवेशप्रकियेमध्ये इतर बोर्डाच्या विद्यार्थ्याच्या तुलनेत स्टेट बोर्डाची मुलं मागे पडण्याची भीती आहे. काही पालक आणि विद्यार्थ्यांनी याबाबतची भीती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना बोलून दाखवली आहे. त्यानुसार लवकरच तावडे केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांशी बोलून CBSE आणि ICSE या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे 11 वी ज्युनियर कॉलेज प्रवेशसाठी लेखी परिक्षेचेच गुण ग्राह्य धरले जावेत अशी मागणी करणार आहेत. Maharashtra Board SSC Results 2019: महाराष्ट्र बोर्ड 10 वी चे पेपर्स रिचेकिंगला देण्यासाठी mahresult.nic.in या वेबसाईटवरुन अर्ज कसा कराल?
अंतिम निकाल लावताना CBSE आणि ICSE, IB च्या मुलांचे शाळांनी अंतर्गत परिक्षेत दिलेले काही गुण ग्राह्य धरले जातात. हा प्रकार महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम निकालामध्ये नाही. त्यामुळे त्यांच्या यंदा इतर बोर्डाच्या तुलनेत स्टेट बोर्डाच्या मुलांचे गुण आणि टक्केवारी कमी आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना ही तीव्र चिंता व्यक्त केली. त्यानुसार विचार विनिमय करून राज्य सरकारने केंद्राशी बोलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची विनंती केंद्राने मान्य केलयास अनेक विद्यार्थ्यांची 11वीच्या प्रवेशादरम्यान कट ऑफ लिस्ट दरम्यान होणारी ओढाताण कमी होऊन मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
यंदा महाराष्ट्र राज्यात एसएससी बोर्डाचा निकाल 77 % लागला आहे.