5 मार्चपर्यंत राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती होईल आणि ही भरती प्रक्रिया आता थांबणार नाही, असं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी (Vinod Tawde) दिलं असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

अनेकदा डीएड, बीएड आणि टीईटी पास असलेल्यांना नोकरी न मिळाल्याने बेरोजगारीला सामोरे जावे लागते. त्यामुळे भरतीचं नवं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदेत शिक्षकांची भरती केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले.  मेगाभरतीनंतर राज्यात 'शिक्षक भरती'ची घोषणा; पाहा कोणत्या इयत्तांसाठी किती आहेत रिक्त जागा

यापूर्वी फेब्रुवारी 2018 पर्यंत राज्यात 24 हजार जागा भरल्या जातील, अशी घोषणा विनोद तावडेंनी केली होती. मात्र अद्याप भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही. आता हे नवं आश्वासन कधीपर्यंत सत्यात उतरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.