Parbhani News: परभणीच्या सेलू तालुक्यातील देऊळ गावातील (गात ) खेडेगावात एक संतापजनक घटना घडली आहे. या ठिकाणी माकडाच्या टोळीने हैदोस घातला आहे. माकडानी आतापर्यंत दोन महिलांसह १० ते १५ जणांचा चावा घेतला आहे. दिवसेंदिवस माकडाचा त्रास वाढत असल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या संदर्भात तक्रार देऊन ही कोणीही मदतीस आले नाही असं गावकऱ्यांनी सांगितले आहे. हेही वाचा- पतीसोबत प्रियकरालाही घरात ठेवण्याचा महिलेचा आग्रह
मिळालेल्या माहितीनुसार, माकडांच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. सेलू गावातील गात येथे माकडांनी धुमाकुळ माजवला आहे. घटनेमुळे गावात अघोषित संचारबंदी लागली आहे. रस्त्यावर एकटे बाहेर पडणे हे धोकादायक झाले आहे. गात गावातील लोकांमध्ये भीतीच पसरली आहे. गावातील नागरिकांना माकाडांच्या टोळीने सळो की पळे करून सोडले आहे.
माकडाच्या टोळींनी गात गावातच मुक्काम ठोकला आहे. माकडाच्या टोळीने लहान मुलांपासून ते मोठ्यां लोकाना टार्गेट केले आहे. माकड घराघरात जाऊन वस्तूचे नुकसान देखील करत आहे. एवढेच नव्हे तर वस्तू चोरून घेऊन जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. या सर्व घटना गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागाकडे माकडांचा बदोबस्त करा अशी मागणी केली आहे. परंतू तक्रार करुन ही विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील गोरेगाव येथील वनराई येथे माकडांनी उच्छांद मांडला आहे.