Photo Credit: Pixabay

महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाऊस दाखल झाला आहे.काही ठिकाणी तर मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली व त्यामुळे खूप नुकसान देखील झाले. तसेच विदर्भात देखील मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यासोबतच वादळीवाऱ्याने ही विदर्भात नुसता धुमाकूळ घातला आहे. काही वेळ कोसळलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे सलग पडत असलेल्या पावसाने शेतकरीही सुखावलाय.

काल ११ जून संध्याकाळी वारा आणि पावसाने विदर्भातील बहुतांश भागात मोठे नुकसान केल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.काल सायंकाळी चिखली, सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. यावेळी अनेक घरांवरील छत उडून गेली. तर अनेक मोठी झाडेही उन्मळून पडली. दरम्यान चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. जोरात आलेल्या वादळी वाऱ्याने नेक घरावरील छत उडालीत. यावेळी एका घरात छताला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्यांची चिमुरडी झोपली होती. दरम्यान या वादळाने छतासंहित चिमूकळीचा झोका देखील उडवून नेलाय. ज्यामुळे झोकयात झोपलेल्या त्या सहा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.आज विदर्भत मध्य गडगडाट सोबत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर कृपया हवामान अंदाज पाहून घरच्या बाहेर जाण्याचे नियोजन कारा.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने विदर्भ शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे..हेही वाचा:  Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या हवामान अंदाज

 

नागपूर सह आजुबाजूच्या भागातील हवामान अंदाज

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. केरळमध्येही गेल्या 24 तासांत लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे, त्रिशूरमध्ये 11 सेमी आणि इतर अनेक प्रदेशांमध्ये 7 ते 9 सेमी पाऊस झाला आहे.कर्नाटक, कोकण, गोवा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील किनारपट्टी भागातही मुसळधार पाऊस पडत आहे.