Ajit Pawar and Jai Pawar | Instagram

बारामती (Baramati) मध्ये लोकसभा निवडणूक पवार विरूद्ध पवार झाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये (Vidhan Sabha Election)  बारामती (Baramati)  मध्ये काय होणार? याची चर्चा सुरू आहे. 2014 च्या लोकसभेत पार्थ पवार आणि 2019 च्या लोकसभेत सुनेत्रा पवार पराभूत झाल्यानंतर आता विधानसभेत बारामती मधून जय पवार (Jai Pawar) निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एकीकडे युगेंद्र पवार शरद पवारांकडून निवडणूकीच्या मैदानामध्ये उतरण्याची चर्चा आहे अशावेळी ही निवडणूक पुन्हा काका विरूद्ध पुतणा होणार का? अशीही चर्चा आहे. आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपण बारामती मधून विधानसभा लढवण्यास उत्सुक नसल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार बारामती मधून नाही लढणार?

अजित पवार आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना “शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी बारामती मधून 7-8 वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू.” म्हणाले आहेत.  नक्की वाचा: Ajit Pawar on Supriya Sule: 'सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभं करणं ही माझी चूक,' अजित पवार यांचं जन सन्मान यात्रेदरम्यान मोठं वक्तव्य. 

जय पवार बारामती मध्ये निवडणूकीला?

बारामती मधून आता अजित पवारांकडून त्यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देण्याबद्दल चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी जय पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चा फेटाळल्या देखील नाहीत. जनता आणि पक्षाची संसदीय समिती काय निर्णय घेणार त्यावर हे अवलंबून असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान अजित पवार कर्जत जामखेड मधून निवडणूकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. पवार विरूद्ध पवार संघर्ष सुरू झाल्यापासून रोहित पवार अजित पवारांवर टीका करताना दिसले आहेत. आता अजित पवार रोहित पवारांविरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.