चेंबूर माजी नगरसेविका निलम डोळस यांचा शिवसेनेत प्रवेश, खासदार नारायण राणे यांना मोठा धक्का
Neelam Dolas (Photo Credits-Facebook)

आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी (Vidhan Sabha Election) शिवसेनेत (Shiv Sena)दुसऱ्या पक्षातील नेतेमंडळी प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभुमीवर चेंबूर (Chembur) माजी नगरसेविका निलम डोळस (Neelam Dolas) यांनी  शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते डोळस यांना शिवबंधन हातात बांधण्यात आले. परंतु डोळस यांच्या शिवसेना प्रवेशामुळे खासदार नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच ईशान्य मुंबईचे कार्यकर्ते हरीश विचारे यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेत विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अन्य पक्षातील नेतेमंडळींचे इनकमिंग सुरुच आहे. तर आज डोळस यांनी प्रवेश केल्याने त्यांच्या अनुभवाचा उपयोग विधानसभेसाठी होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी येथील आमदार दिलीप सोपाल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: गणेशोत्सवानंतर लागू होणार आचारसंहिता, 15 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार विधानसभा निवडणुक: सुधीर मुनगंटीवार यांचा अंदाज)

तसेच उद्या मातोश्रीवर छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत एका विश्वासू सुत्रांकडून देण्यात आली असल्याची अधिक माहिती न्यूज 18 लोकमत यांनी दिली आहे. एवढेच नाही तर शिवसेनेत प्रवेश करण्यावेळी आपली ताकद दाखवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर पोहचणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.