Patient Reports Being Used As Paper Plates (PC - X/@KishoriPednekar)

Patient Reports Being Used As Paper Plates: मुंबईतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णालयाचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसत आहे. हे प्रकरण मुंबईतील केईएम रुग्णालयातील (Mumbai KEM Hospital) आहे. येथील रुग्णांच्या रिपोर्ट्सपासून चक्क कागदी प्सेट्स (Paper Plates) बनवल्याचं व्हिडिओमध्ये उघडकीस आलं आहे. मुंबईतील नागरी संस्था संचालित किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालयाच्या सहा कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या रिपोर्टने बनवलेल्या कागदी प्लेट्सचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी X वर या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर घोर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) हस्तक्षेप करून घटनेची चौकशी करण्यासाठी एक पॅनेल तयार केले असून रुग्णालयाच्या डीनकडून या घटनेचे स्पष्टीकरण मागितले आहे. (हेही वाचा -Mumbai Hospitals Receive Bomb Threats: मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बच्या धमक्या; व्हीपीएन नेटवर्कवरून आले ईमेल, तपास सुरु)

केईएम रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांनी स्पष्ट केले की, प्लेट्स रुग्णांच्या अहवालांपासून बनविल्या जात नाहीत तर भंगार विक्रेत्यांना देण्यात आलेल्या सीटी स्कॅनच्या जुन्या फोल्डरमधून बनविल्या गेल्या आहेत. बीएमसीच्या निवेदनानुसार, रुग्णांना त्यांचे सीटी स्कॅन, एमआरआय आणि एक्स-रे रिपोर्ट्स पेपर फोल्डरमध्ये मिळतात. हे जुने फोल्डर नंतर भंगार विक्रेत्यांना देण्यात आले. (हेही वाचा, Hand Donation in Mumbai: KEM Hospital मध्ये पहिल्यांदाच हात दान; ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयदानामुळे 5 जणांना फायदा)

पहा व्हिडिओ -

आता बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावरून गदारोळ सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने सहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर उघड करत रुग्णालय प्रशासन आणि महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत.