![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/07/31-60-380x214.jpg)
जुलै महिना सुरु झाल्यानंतरही विदर्भात (Vidarbha) पावसाने दडी मारल्याने जल संकटाचे ढग आणखी गडद झाले आहे. विदर्भात अद्याप दमादर पाऊस (Rain) न पडल्याने बहुतांश जिल्ह्यातील मोठ्या धारणांची पाण्याची पातली खालावली आहे. एकीकडे हवामान विभागाने (IMD) विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देऊन देखील अंदाजाप्रमाणे पावसाने दांडी दिल्याने शेतकर्यांचा हिरमोड झाला आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (हेही वाचा - konkan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!)
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट असून जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच आहेत. अशातच गोंदिया जिल्ह्यातील बाघ-इटिया डोह प्रकल्पांतर्गत इटियाडोह धरणासह बाघ प्रकल्पाचे पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या मोठ्या धरणासह बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंदा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी आणि कलपाथरी असे 9 मध्यम प्रकल्प असून 23 लघु प्रकल्प आणि गोंदिया पाठबंधारे विभागाची 38 तलाव आहेत.
गोंदिया जिल्ह्यात सरासरी 1245 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद होते. मात्र, गेल्या काही वर्षात पावसाची सरासरी कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. यावर्षीही जून महिना कोरडाच गेल्याने सद्यस्थितीला गोंदिया जिल्ह्यातील मुख्य जलाशयांमध्ये 17 टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 30 टक्के जलसाठा शिल्लक आहे. ही आकडेवारी गोंदिया जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.