International Women's Day: 'चला सखी हो, कायद्यावर बोलू काही' जागतिक महिला दिनानिमित्त वर्षा गायकवाड यांचे खास ट्वीट
Education Minister Varsha Gaikwad (PC - MahaDGIPR)

संपूर्ण जगात दरवर्षी आजच्या दिवशी (8 मार्च) जागतिक महिला दिन (International Women's Day) साजरा केला जातो. महिला दिनाच्या निमित्ताने महिला शक्तीचा जागर केला जात आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महत्वाची माहिती शेअर करत सर्व महिलांना जागतिक महिला दिनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी महिलाच्या सुरक्षतेसाठी करण्यात आलेल्या कायद्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांनाही यातून इशारा दिल्याचे समजत आहे.

स्त्रीत्वाचा उत्सवाच्या अर्थात जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! नारीशक्तीला सलाम! अशा आशयाचे वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त वर्षा गायकवाड यांनी केलेले ट्विट सर्वात खास ठरत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत होणारी वाढ पाहता यासंदर्भात कोणकोणते कायदे करण्यात आले आहेत, याची त्यांनी माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Happy Women's Day 2021: जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत Surekha Yadav ते Mumtaz Kazi यांनी सांभाळलं मध्य रेल्वेच्या ट्रेनचं सारथ्य; पहा Central Railway चं वूमन्स डे सेलिब्रेशन!

वर्षा गायकवाड यांचे ट्वीट-

वर्षा गायकवाड यांचे ट्वीट-

महिला दिन साजरा करण्याची सुरुवात 28 फेब्रुवारी 1909 साली झाली होती. मात्र, 8 मार्च, 1917 रोजी रशियातील महिलांना मताधिकार प्राप्त झाला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 साली या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर 8 मार्च हा दिवस नियमितपणे जागतिक पातळीवर ‘जागतिक महिला दिवस’ साजरा करण्यास सुरुवात झाली.