वरंधा घाटातील रस्ता खचल्याने प्रवासासाठी धोकादायक, पर्यटकांना अतिदक्षतेचा इशारा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात जवजवळ 30 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून भोर- महाड (Bhor-Mahad)  मार्गावरील वरंधा घाटातील (Varandha Ghat) रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणाहून सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धारमंडप ते वाघजाई दरम्यानच्या रस्त्यावरील डोंगराच्या बाजूचा भाग पावसामुळे खचला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या मार्गावर विजेचे खांब सुद्धा अल्प प्रमाणात असल्याने वाहनचालकांनी येथून जाताना सावधानता बाळगावी. त्याचसोबत यो भागात अनेक धबधबे असल्याने पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परंतु या मार्गावर रस्ता पावसामुळे खराब झाल्याने दरड पडण्याची शक्यता आहे.

(Tiware Dam Incident: तिवरे धरणफुटी दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृतदेह हाती, 24 जण वाहून गेल्याची शक्यता, विरोधकांनी धरला आक्रमक सूर)

तर घाटातील रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे पडलेले दिसून येत आहे. तसेच वाहन चालवताना फार अडथळे येतात. त्यामुळे वरंधा घाटातून जाताना सतर्कता बाळगा अन्यथा दरीत कोसळ्याची शक्यता फार प्रमाणात आहे.