Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

15 ते 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण (Corona Vaccination ) मंद गतीने होत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या 10 दिवसांत, केवळ 12 टक्के पात्र लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे.  महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत 15 ते 17 वयोगटातील सुमारे नऊ लाख मुले आहेत. यापैकी आतापर्यंत 1.08 लाख बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.  बुधवारपर्यंत BMC केंद्रांवर 95,441, खाजगी रुग्णालयांमध्ये 9,359 आणि राज्य सरकार संचालित केंद्रांमध्ये 3,580 लसीकरण करण्यात आल्याचे डेटा दर्शवते. 3 जानेवारीपासून बालकांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. महाराष्ट्रात कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद केले आहेत. हेही वाचा COVAXIN ही प्रौढ आणि मुलांसाठीची सार्वत्रिक लस- भारत बायोटेक

अधिका-यांनी सांगितले की, लसीकरणासाठी खूप कमी मुले दिसत आहेत. बीएमसीने फेब्रुवारीपर्यंत सर्व नऊ लाख मुलांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु कमी प्रतिसाद पाहता हे साध्य करणे कठीण होईल. लसीकरण वाढवण्यासाठी, बीएमसीने शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यावर शिबिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.