उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मथुरा यथील शकूर बस्ती (Shakur Basti) रेल्वे स्थानकावर रेल्वेचा मोठा अपघात होता होता टळला. मल्टीपल युनिट (ईएमयू) ट्रेन ( EMU Train Derailed) रुळावरुन घसरली आणि थेट फलाटावर चढली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, ट्रेनचे आणि फलाटाचे मोठे नुसकान झाले. घडल्या प्रकारामुळे उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटेची दखल घेत ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
मथूरा स्टेशनचे प्रमुख एस के श्रीवास्तव यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ट्रेन फलाटाला लागली होती. ट्रेनमधील सर्व प्रवासी आगोदर खाली उतरले होते. जे ट्रेनमध्ये चढले होते ते आपापल्या आसनावर स्थानपन्न झाले होते. तसेच ट्रेनचा वेगही प्रचंड कमी होता. इतक्यात डबे रुळावरुन घसरले. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. ही घटना का घडली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. लवकरच त्याची चौकशी केली जाईल.
व्हिडिओ
#WATCH | Uttar Pradesh: An EMU train coming from Shakur Basti derailed and climbed the platform at Mathura Junction. (26.09) pic.twitter.com/ZrEogmvruf
— ANI (@ANI) September 26, 2023
मल्टीपल युनिट (ईएमयू) ट्रेन रात्री 10:49 च्या सुमारास शकूर बस्ती येथे दाखल होते. नेहमी प्रमाणे ही ट्रेन फलाटाला लागली. प्रवासीही खाली उतरले. मात्र, ट्रेन जेव्हा पुन्हा सुरु झाली तेव्हा अचानक ती रुळावरुन घसरली आणि थेट फलाटावर चढली. ज्यामुळे या मार्गावरील इतर गाड्या प्रभावीत झाल्या आहेत.