Mumbai Police (Photo Credits: PTI)

पीर साहेब मखदुम शाह बाबा यांचे उरुस म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे दरवर्षी असंख्य भाविक मखदुम शाह बाबा यांच्या दर्शनासाठी माहीम दर्ग्याला जातात. यंदाही 11 डिसेंबर ते 20 डिसेंबर रोजी शाह बाबांचा उरुस म्हणजेच मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त जगभरातून येणा-या त्यांच्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून माहिम परिसरातील वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने भाविक त्यांच्या दर्शनासाठी येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मार्ग बदलण्यात आले असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

नोकरीला जाणा-या तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची तसेच या दर्ग्यावर येणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे मार्ग बदलण्यात आले आहे.

पाहूयात काय आहेत हे पर्यायी मार्ग:

बांद्रा पश्चिमेकडून माहीमकडे येणा-या वाहन चालकांनी मोरी रोड मार्गाने सेनापती बापट मार्गाचा वापर करावा. दक्षिण मुंबई शहराकडून पश्चिम उपनगराकडे जाणा-या वाहनचालकांनी एल.जे.रोड, सेनापती बापट मार्ग व धारावी टी कलानगर या मार्गाचा वापर करावा.

वरळीकडून माहीमकडे येणा-या व पुढे उपनगराकडे जाणा-या वाहन चालकांनी शिवाजी पार्क नंतर हरिओम जंक्शन, शितलादेवी मंदिर रोड, सेनापती बापट मार्गाचा वापर करावा.

या मार्गावरील बदलण्यात आलेले वाहतुकीचे मार्ग हे 11 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान राहतील.