Uran Fire Updates: ONGC प्लांट ची आग आटोक्यात आणण्यात यश; 7 जणांचा मृत्यू
Uran Fire (Photo Credits: ANI)

नवी मुंबईतील उरण जवळ असलेल्या ONGC प्लांटला आज सकाळी 7 च्या सुमारास आग लागली होती. ही आग आता आटोक्यात आणण्यास अग्निशमन दल आणि प्रशासनाला यश आलं आहे. ONGC ने त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातूनही आग आटोक्यात आल्याचे वृत्त शेअर केले आहे. गॅस प्लांटमध्ये रात्रीच्या वेळेत काम करणारे काही कर्मचारी अडकल्याने या आगीत गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार ओनजीसीच्या प्लांटला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला असून काही गंभीर जखमी कामगारांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओएनजीसीने केलेल्या ट्वीट नुसार, सुरूवातीला प्लांटमधील स्टॉर्म वॉटर ड्रेनेजमध्ये आग लागली. ही आग ओएनजीसी फायर सर्व्हीस आणि क्रायसिस मॅनेटमेंटच्या टीमने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीचा प्लांटमधील ऑईल प्रोसेसिंगवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे ओएनजीसीने स्पष्ट केले आहे. सध्या या प्लांटमधील ऑईल प्रोसिसिंग सुरक्षित असून गॅस Hazira Plant

द्वारा डायव्हर्ट करण्यात आल्याचं म्हटलं आहे. Uran Fire: उरण जवळ ONGC प्लांटला भीषण आग; कामगार गंभीर जखमी

ONGC Tweet

आज सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच आजुबाजूच्या परिसरातही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. प्लांट पासून दीड ते दोन किमी परिसरात नागरिकांनाही मज्जाव करण्यात आला होता.