Uran Fire: उरण जवळ ONGC प्लांटला भीषण आग; कामगार गंभीर जखमी
Uran Fire (Photto Credits: Twitter/ANI)

उरण जवळ ओनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लॅंटला (Oil and Natural Gas Corporation)  आज (3 सप्टेंबर) भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 3 कामगार जखमी झाले असून आता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. आगीमध्ये भाजलेल्या जखमींवर खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही आग सकाळी 7 च्या सुमारास लागली होती.एक ते दीड किमी परिसरातील गावकऱ्यांना गाव सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, उरणमध्ये लागलेली आग ही लिक्विड गळतीमुळे लागली आहे. उरण ओनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये रात्री काम करणारे कामगार होते. अचानक आग भडकल्यानंतर सुरूवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये 3 कामगारांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ANI Tweet

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जेएनपीटी, पनवेल, नेरूळ येथून अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ANI च्या ट्वीटनुसार, उरण जवळील आगीमध्ये ऑईल प्रोसेसिंग सुरक्षित असून गॅस Hazira Plant मध्ये वळवण्यात आला आहे.