Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राहुल गांधीच्या सभेत आज एक अजब प्रकार घडला आहे. एका अज्ञाताने भर सभेत फटाके फोडून सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी राहुल गांधी यांनी या फटाके वाजवणाऱ्याचा निषेध केला आहे. राहुल गांधींचं भाषण सुरु असतांना अज्ञाताने फटाके फोडल्यामुळे  राहुल गांधी यांना आपलं भाषणाचा अर्धवट समारोप करावा लागला. नांदेड, वाशिमनंतर आता भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येवून ठेपली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात भास्तान गावात सभा सुरु असताना ही प्रकार घडला आहे. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात अनेक शेतकरी शहीद झालेत. या शहीद शेतकऱ्यांना  श्रद्धांजली अर्पण करत असताना थेट राहुल गांधी उभे असलेल्या स्टेज जवळच फटाके फोडण्यात आलेराहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यास सांगितले आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. तरी या आतिषबाजी नंतर ज्याने कोनी ही हरकत केली त्याला ताब्यात घ्यावे असे माईकवर सांगिण्यात आले.  तरी स्टेजजवळ फटाके फोडलेत म्हणजेचं कॉंग्रेसचेच कुणी कार्यकर्ते असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

दरम्यान, सभेत फटाके फोडण्यावरून भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. "राहुल गांधी यांनी बोलावलेल्या कॉर्नर सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना फटाके फोडून आनंद साजरा केला आणि आपली शेतकऱ्यांप्रति असंवेदनशीलता दाखविली. शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना फटाके फोडतात का, असा सवाल उपस्थित करत भाजपने राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. (हे ही वाचा:- 'राहुल गांधी जोपर्यंत सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना मुंबईत येऊ देणार नाही'- MP Rahul Shewale)

 

कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात येवून ठेपली आहे. राज्यातील जनतेकडून राहुल गांधीच्या या यात्रेस उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरी भर सभेत आतीषबाजी करणं, सभेत भारता ऐवजी नेपाळचं राष्ट्रगीत वाजणं हा केवळ योगायोग आहे की विचारपूर्वक आयोजिलेली मोहिम याबाबत शंकाकुशंका उपस्थित होत आहे.