आपल्या दोन मुलांना पैशाच्या अभावी सीबीएसई संलग्न शाळेत पाठवू शकत नसल्याने एका 26 वर्षीय महिलेने तिचे आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीचे जीवन विहिरीत उडी मारून संपवले असल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेची माहिती ही दिली आहे. मध्य महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मालेगाव येथे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. बुधवारी औराद शहाजनी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. (हेही वाचा - Jalgaon Rape Case: सहा वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या; संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला; जळगाव जिल्ह्यातील घटना)
प्राथमिक तपासानुसार, भाग्यश्रीला तिच्या मुलाला आणि मुलीला CBSE-संलग्न शाळेत पाठवायचे होते, जे तिच्या पतीच्या पलीकडे होते. यामुळे ती अनेकदा नैराश्यात असायची, असे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
गेल्या वर्षी तिने तिची आई गमावली होती आणि त्यामुळे तिच्या नैराश्यातही वाढ झाली होती, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या आपल्या मुलीसह अन्य एका शेतकऱ्याच्या मालकीच्या विहिरीवर गेल्या. तेथून तिने पती व्यंकट हालसे यांना व्हिडिओ कॉल करून मुलीचा शेवटचा चेहरा पाहण्यास सांगितले आणि त्यानंतर मुलीसह विहिरीत उडी घेतली.
त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या महिलेने खेळत असलेल्या आपल्या मुलालाही सोबत विहिरीत नेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो निसटला आणि त्यामुळे तो बचावला, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.