उद्धव ठाकरे पंढरपूर दौरा: पाहा कसा असेल दिनक्रम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य- फेसबुक)

Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray Pandharpur Visit: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (सोमवार, 24 डिसेंबर) पंढरपूर दौऱ्यावर आहेत. उद्धव यांच्या पंढरपूर दौऱ्यला त्यांनी केलेल्या अयोध्या ( Ayodhya) दौऱ्याशी जोडले जात आहे. त्यामुळे पंढरपूर दौऱ्यात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राम मंदिर (Ram Mandir) मुद्द्याचा पुनरुच्चार करतील अशी शक्यता प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यादौऱ्यात जाहीर सभेला संबोधीतही करणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसेना (Shiv Sena) पंढरपूरमध्ये शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनेक शिवसैनिक पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. तर काही पोहोचत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दिवसभरातील कार्यक्रमांचे वेळापत्रक पाहिले असता जाहीर सभेत उद्धव ठाकरे हे काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे पंढरपूर दौरा दिनक्रम

उद्धव ठाकरे पंढरपूर दौऱ्यासाठी मुंबईहून निघतील. दुपारी एकच्या दरम्यान पंढरपूर येथील विश्रामगृह येथे हेलिकॉप्टर ने त्यांचे आगमन होईल. दुपारी 1 ते 3 या काळात ते विविध शिष्टमंडळांच्या भेटी घेतील. 3.30 ला ते श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतली. दर्शन आटोपल्यावर 4 वाजता त्यांचे सभास्थळी आगमन होईल. 6.30 वाजता चंद्रभागा नदी तीरावरील इस्कॉन घाटावर महा आरतीसाठी उपस्थिती दर्शवल्यावर उद्धव ठाकरे 7.45 वाजता वाहनाने पुण्याकडे रवाना होतील. (हेही वाचा, महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी टाकण्यासाठी उद्धव ठाकरे विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला;राम मंदिर मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता!)

महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी टाकण्यासाठी पंढरपूरात; उद्धव ठाकरे यांचा इशारा

दरम्यान, 'विठोबा हा आमचा आत्मा आहे. हाच तो आमचा देव, ज्याने महाराष्ट्र एकसंध ठेवला' असे सांगत 'गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुरांचा हाच देव आहे आणि त्याच्याच चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी आम्ही टाकू इच्छितो. याच ठिणगीने आज कोरडी झालेली चंद्रभागा खळखळता प्रवाह घेऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् केल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या दै. सामनातून दिला आहे.