Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

मराठवाडा (Marathwada) हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिंदे (Shinde Group) आणि ठाकरे (Thackeray Group) गटासाठी हा अत्यंत महत्वाचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर पहिला दौरा मराठवाड्याचा केला होता. तर सरकार कोसळल्या नंतर आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रा मराठवाड्यात गाजली होती. आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर आहे. तरी या दौऱ्या दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हा दौरा करत असल्याने या दौऱ्यास विशेष महत्व आहे. एवढचं नाही तर राज्यातील सत्तांतरानंतर उध्दव ठाकरेंचा हा पहिला दौरा असल्याने या दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

 

परतीच्या पावसाने मराठवाड्यात (Marathwada) मोठं नुकसानं झालं आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना निवेदन दिलं होतं. पण आता थेट उध्दव ठाकरे औरंगाबादची पाहणी करणार असल्याने या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. (हे ही वाचा:- Narayan Rane Statement: ठाकरे गटातील चार आमदार माझ्या संपर्कात, लवकरच शिंदे गटात होणार सामील, मंत्री नारायण राणेंचा गौप्यस्फोट)

 

आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. तर तिथूने ते गंगापूरच्या दिशेने प्रयाण करतील. दरम्यान गंगापूर तालुक्यातील दहेगाव, पेंढापूर नुकसान ग्रस्त भागाची पाहाणी करणार आहे. तसेच या दौऱ्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. तरी या पत्रकार परिषदेदरम्यान उध्दव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.