Uddhav Thackeray And Prakash Ambedkar | (Photo Credit - Twitter)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ( Shiv Sena) आणि अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आज (23 जानेवारी) नव्या युतीची घोषणा करतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती (Balasaheb Thackeray Birth Anniversary 2023) आहे. त्यांच्या जयंतीदिनीच ही घोषणा केली जाणार आहे. शिवसेना खासदार (उद्धव ठाकरे गट) संजय राऊत यांनीही ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईतील नायगाव येथे आंबेडकर भवन येथे दुपारी 12.30 वाजता युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रकाश आंबेडकर यांना युतीची साद घातली होती. मात्र, वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. वंचितसोबत आघाडी हवी असेल तर एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडावी अशी थेट भूमिका आंबेडकर यांनी जाहीर केली होती.

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक आणि नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी युती निश्चित झाली आहे. दक्षिण मुंबईतील दादर येथील शिवसेना भवन किंवा आंबेडकर भवन येथे ही घोषणा होणार आहे.

ट्विट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच 'बाळा साहेबांची शिवसेना' या पक्षाची 'द पीपल्स' रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्याशी युती करण्याची घोषणा केली. कवाडे हे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील एक उल्लेखनीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.