मी वादळात उभा आहे, मी संकटात उभा आहे, तुम्ही वादळात उभे राहाल का, अशी भावनीक साद उद्धव ठाकरेंनी परभणीकरांना घातली. परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. यासभेत बोलतना उद्धव ठाकरेंनी भाजप, पीएम मोदी, निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या गीतातील 'जय भवानी' शब्द आक्षेप घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, अमित शहांवर जोरदार टिका केली. उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताच, पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी, लोकांनी पावसात भिजून सभा ऐकली. तर, उद्धव ठाकरेही पावसात भिजल्याचं दिसून आलं. (हेही वाचा - Lok Shabha Elections 2024: नागरिक NGSP पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

पाहा व्हिडिओ -

परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही सर्व त्याचे सैनिक आहात. भाजपला असं वाटलं असेल, मिंध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी खरेदी करता येत पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेना प्रमुखांनी कमवलेलं प्रेम आहे जे आशीर्वादाच्या रुपाने माझ्या समोर बसलंय. ही आपली परीक्षा आहे. वादळालासुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहेत. आम्ही पाठीवर वार करत नाहीत. आम्ही वादळाच्याही छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.

महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची आज परभणीत जाहीर सभा होती. यावेळी, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.  मोदींवर निशाणा साधला. अब की बार, भाजपा तडीपार करायची आहे. कारण, हे आपला महाराष्ट्र लुटत आहेत, आपले उद्योग पळवून नेत आहेत. त्यामुळे, बंडु जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करा, असे म्हणत महादेव जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेतून केलं.