Uddhav Thackeray Maharashtra CM Swearing Live Streaming: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा 'इथे' पहा लाईव्ह
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (Maharashtra CM Oath Taking)  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शपथविधी  सोहळ्याची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. संध्याकाळी ठीक 6.40 वाजता शिवसेना (Shivsena) अध्यक्ष शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बाळासाहबे ठाकरे  (balasaheb Thackeray) यांच्या शिवतीर्थावर आज हा सोहळा रंगणार असून आज सकाळ पासूनच याची जय्यत तयारी सुरु होती. ठाकरे कुटुंबीय, शिवसेना परिवार आणि महाराष्ट्राची जनता ज्या क्षणाची वाट पाहात आहे तो जवळ येऊ लागला आहे. या भव्य शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून खास सोय करण्यात आली आहे.

शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसच्या महाविकासाआघाडीचे अनेक मान्यवर नेते जसे की, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील देखील शिवाजी पार्कात तयारीच्या कामात रुजू झाले होते. उद्धव ठाकरेंच्या रूपाने ठाकरे कुटुंबीयांतील पहिले ठाकरे थेट मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर बसणार असल्याने आता शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नारायण राणे यांच्या नंतर 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार आहे.

इथे पहा उद्धव ठाकरे यांचा भव्य शपथविधी सोहळा

या सोहळ्यासाठी नितीन देसाई यांनी शिवाजी पार्कवर खास थीमवर स्टेज उभारला आहे. शिवतीर्थावर पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी सहा हजार चौरस फुटांचे व्यासपीठ उभारले जाणार आहे. यावर जवळजवळ 100 लोक बसू शकतील इतक्या खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे. या शपथविधीसाठी नयनरम्य सेट उभारण्यासाठी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. याशिवाय शिवाजी पार्कात 70 ते 80 हजार आसन व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. खास म्हणजे या सोहळ्यासाठी पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजप नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे.

दरम्यान, कार्यक्रमावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. राज्यातील 2000 पोलिसांची फौज सज्ज करण्यात आली आहे.