Photo Credit: Twitter

शिंदे विरुध्द ठाकरे असा सामना महाराष्ट्राच्या (Maharashtra) रिंगणात रंगला असताना गेले दोन दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ठाकरे सह शिंदे गटाला आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. कारण निवडणुक आयोगाकडून (Election Commission) ते गोठवण्यात आले आहेत. तरी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणुक आयोगापूढे पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी तीन पर्याय दिले आहेत. दरम्यान या बाबतीत काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी उध्दव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक आमदार खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकी दरम्यान उध्दव ठाकरेंना अश्रू अनावर झाल्याचा किस्सा शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी ठाण्यातील (Thane) प्रबोधन यात्रेत त्यांनी सांगितला. तसेच धनुष्यबाण गमावल्याचं खरं दुख हे उध्दव ठाकरेंना झालं इतर कुणाला किंवा कुठल्या गटाला नाही असा खोचक टोला भास्कर जाधवांनी लगावला.

 

धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना (Shiv Sena) हे नाव गमावल्यानंतर ठाकरे गटाकडून आता पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय जारी करण्यात आले आहेत. यांत त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल असे तीन पर्याय आहे. तर पक्ष्याच्या नावासाठी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' (Shiv Sena Balasaheb Thackeray) ही पहिली पसंती, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) ही दुसरी आणि 'शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे' (Shiv Sena Balasaheb Prabodhankarak Thackeray) तिसरी पसंती असेल. तरी निवडणुक आयोग आता ठाकरे गटाच्या कुठल्या चिन्हावर शिक्कामोर्तब करणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. (हे ही वाचा:- Raj Thackeray Tweet: सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसैनिकांनी आपली भुमिका मांडू नये, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन)

 

तरी पक्ष नाव आणि पक्ष चिन्हाचा हा निवडणुक आयोगाचा (Election Commission) निर्णय हा तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय आहे. कारण निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. आता शिंदे गट किंवा ठाकरे गट पक्षाचं काय नाव लावणार किंवा कुठलं पक्षचिन्ह वापरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तरी या दोन्ही गटाकडून निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर प्रतिक्रीया देण्यात आल्या आहेत.