Bala Nandgaonkar, Uddhav Thackeray (फोटो सौजन्य - फेसबुक)

Bala Nandgaonkar On Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. इंडिया टीव्हीच्या 'चुनाव मंच' या कार्यक्रमात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यंदा निवडणूक रिंगणात उतरला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) इंडिया टीव्हीच्या 'चुनाव मंच' कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) नी राज ठाकरेंचा विश्वासघात केला, असा आरोप केला.

महायुतीशी अद्यापही बोलणी सुरू आहेत - बाळा नांदगावकर

इंडिया टीव्हीच्या निवडणूक मंचावर बाळा नांदगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांना मनसे आणि भाजप युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांना नेहमीच बी टीम म्हटले जाते. महायुतीशी अद्यापही बोलणी सुरू आहेत. मनसेचे कार्यकर्ते ग्राऊंड लेव्हलला काम करत असून याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून येईल, असा दावाही यावेळी बाळा नांदगावकर यांनी केला. (हेही वाचा -Bala Nandgaonkar Statement: राज ठाकरेंचे नुकसान झाले तर महाराष्ट्र पेटेल, बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया)

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा विश्वासघात केला -

यासोबतच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा विश्वासघात केल्याचे त्यांनी थेट सांगितले. महाराष्ट्रात उद्धव यांची शिवसेना खूपच कमकुवत आहे. त्यांचा पक्ष निवडणुकीत विशेष काही करणार नाही, असं वक्तव्यही बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. (हेही वाचा - Bala Nandgaonkar on Security Reduction: राज ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय सरकारचे 'खुजेपण' ठळकपणे दाखविणारा आहे- बाळा नांदगावकर)

मनसे 250 जागांवर निवडणूक लढवणार -

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रातील 288 पैकी सुमारे 250 जागांवर एकट्याने निवडणूक लढवणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वीच याची घोषणा केली आहे. मनसेने 45 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे यांचा मुलगा अमित यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.