राजस्थानच्या उदयपूर (Udaipur) पोलिसांनी एका प्राध्यापकाला बलात्कार (Rape) प्रकरणी अटक केली आहे. मुंबईत (Mumbai) कोचिंग सेंटर चालवणाऱ्या महिलेने प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली होती. कोचिंग सेंटर चालवणाऱ्या महिलेचा आरोप आहे की, प्राध्यापकाने तिला उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये लग्नाच्या बहाण्याने बोलावले आणि ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ मिक्स करून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेने मुंबईत तक्रार दाखल केली होती. त्यावर कारवाई करत प्राध्यापकाला रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.
गोगुंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील खारघरमध्ये राहणाऱ्या या महिलेचा तिच्या पतीपासून सुमारे 12 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. ती महिला तिच्या मुलासोबत राहते. ती मुंबईत अभियांत्रिकी कोचिंग संस्था चालवते. या महिलेचा काही काळापूर्वी सोशल मीडियाद्वारे उदयपूरच्या सेक्टर-3 मध्ये राहणाऱ्या नीरज मारोठियाशी संपर्क झाला. पुढे फेसबुकमार्फतच त्यांची मैत्री झाली.
त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. या दरम्यान त्यांनी आपले नंबरही शेअर केले होते. चांगली मैत्री झाल्यानंतर आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन दिले व त्याने तिला उदयपूरला यायला सांगितले. 9 जुलै रोजी या तरुणाला भेटण्यासाठी ही महिला उदयपूरला पोहोचली. या दरम्यान, आरोपीने महिलेला गोगुंदाच्या बरौलीया येथील स्पेक्ट्रम रिसॉर्टमध्ये ठेवले. आता महिलेने आरोप केला की यावेळी आरोपीने कोल्ड ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ मिक्स करून तिच्यावर बलात्कार केला. आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये दरवर्षी 'इतक्या' महिलांची होते हत्या, बलात्काराचा आकडा पाहून बसेल धक्का)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत एका 30 वर्षीय महिलेच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. डेटिंग अॅपद्वारे या दोघांची मैत्री झाली होती. यावेळीही आरोपीने महिलेच्या ड्रिंक्समध्ये अंमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप आहे.