लातूर: नवरा-बायकोच्या भांडणात भाचा-पुतण्याचा नाहक बळी
Image used for represenational purpose (File Photo)

नवरा-बायकोच्या भांडणात लातूरमध्ये (Latur) भर चौकात दुहेरी हत्याकांड घडले आहे. इतकेच नव्हे तर हे भांडणं इतकं विकोपाला गेले की, यात नव-याच्या भाचा आणि पुतण्याची खून करण्यात आला आहे. लातूरच्या भांबरी चौकात हा खळबळजनक प्रकार घडला असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

लातूर शहरातील भांबरी चौकात भीमा चव्हाण आणि ललिता चव्हाण हे दाम्पत्य राहते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात छोटी मोठी भांडणे सुरु होती. . भीमा चव्हाण हे लातूर एमआयडीसीमध्ये मजुरी करतात. तर ललिता या चहाची टपरी चालवतात. त्यांना दोन मुली, दोन मुले आहेत. 28 ऑगस्टच्या संध्याकाळी दोघांमध्ये वाद सुरू झाला. भांडण विकोपाला गेल्याने ललिता चव्हाण यांनी त्यांचा भाऊ बालाजी राठोड यांना फोन करून बोलावून घेतले. बालाजी राठोडने मित्र आणि नातेवाईकांसह लातूर गाठले. याची माहिती कळताच भीमा चव्हाण यांनी वरवंटी या गावातून आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले. यात त्यांचा भाचा आनंद आणि पुतण्या अरूणही होता.

हेदेखील वाचा- नालासोपारा: पतीची हत्या करुन आत्महत्या केल्याचे भासवणाऱ्या महिलेला अटक!

यांच्यातील भांडणाचे रुपांतर हाणामारीत होऊन भीमा चव्हाण यांचा भाचा आनंद आणि पुतण्या अरुणवर चाकूने वार करण्यात आले. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच लातूर एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

आनंद आणि अरुण यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून फरार आरोपींचा तपास सुरु आहे.