Mumbai News: वडाळा येथील महापालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानात पाण्याच्या टाकीत बुडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर गुरुवारी माटुंगा पोलिसांनी उद्यान पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणात पुढील चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर मांटुगा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही मुले बेपत्ता होती शोध घेतल्यानंतर मुलांचा मृतदेह आढळला.( हेही वाचा- डोंबिवली मध्ये पाळणाघरामध्ये लहान मुलांचा अमानुष छळ; मारहाण, उलटं टांगण्याचे प्रकार)
मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा येथील महर्षी कर्वे उद्यानात पाण्याच्या टाकीच दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळले होते. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा दोन उद्यान पर्यवेक्षकांना ताब्यात घेतले.महापालिकेने उद्यानाच्या देखभालीचे कंत्राट हिरावती एंटरप्रायझेस या खासगी कंपनीला दिले होते. ही कंपनी सुरक्षा आणि इतर देखभालीच्या कामांसाठी जबाबदार होती. मात्र, कपंनीने पतीराम विक्रम यादव यांची उद्यान पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केल्याचे समोर आले.
सोमवारी घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाले होते. बेपत्ता मुलांचा शोध घेतल्यानंतर अंकुश मनोज वाघरी ५ आणि अर्जुन मनोज वाघरी ४ हे दोन भाऊ पाण्याच्या टाकीत पडून मरण पावलेले दिसले. या घटनेनंतर वाघरी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक दीपक चव्हाण यांनी या प्रकरणात उद्यान पर्यवेक्षकाला ताब्यात घेतले.त्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन अल्पवयीम मुलांचा मृत्यू झाला. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ (दोषी हत्या) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.