पुणे: बांधकाम सुरू असलेल्या मंदिराचा स्लॅब कोसळला; दोघांचा मृत्यू, 4 मजूर जखमी
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

पुण्यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका मंदिरामध्ये आज अपघात झाला आहे. या दुर्दैवी प्रकारामध्ये मंदिराचा स्लॅब कोसळल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी मजुरांना तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार पुण्यातील पिंपळे गुरव रेसिडेन्शिल  ( Pimple Gurav residential area)भागातील आहे. स्थानिकांच्या मदतीने मजूरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

पिंपळे गुरव स्मशानभूमी परिसरात महादेवाच्या मंदिरामध्ये सभामंडप उभारण्याचं काम सुरु होतं. मात्र दुपारी स्लॅब कोसळला आणि काही मजूर या स्लॅबच्या ढिगार्‍याखाली सापडले. स्थानिक लोकं आणि अग्निशामक दलाच्या गाड्या अपघात स्थळी पोहचल्या आहेत.