Two Vehicles With Same Number Plate: मुंबईतील ताजमहाल हॉटेल (Taj Hotel) मध्ये एकच नंबर प्लेट असलेली दोन वाहने (Two Vehicles With Same Number Plate) सापडली आहेत. दोन्ही वाहने एकाच मॉडेलची असून ती हॉटेलच्या गेटच्या आत होती. वाहने संशयास्पद मानून मुंबई पोलिस वाहनांची तपासणी करत आहेत. एका कार चालकाने चालान टाळण्यासाठी कारची नंबर प्लेट बदलल्याचे सांगण्यात येत आहे. या कारणामुळे खऱ्या क्रमांकाची कार आणि बनावट क्रमांक असलेली कार एकाच वेळी हॉटेलमध्ये पोहोचली. मूळ क्रमांक असलेल्या कारच्या मालकाने आपल्या कारची नंबर प्लेट असलेली दुसरी कार उभी असल्याची माहिती पोलिसांना दिली.
एकच नंबर प्लेट असलेली दोन वाहने -
यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. मुंबई पोलिसांना MH01EE2388 नंबर प्लेट असलेली दोन वाहने सापडली आहेत. यापैकी कोणती वाहने चुकीची नंबर प्लेट लावून फिरत आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ही कार कोणाच्या नावावर आहे आणि तिची खरी नंबर प्लेट कुठे आहे? याचा तपास पोलिस करत आहेत. सध्या दोन्ही कार पोलिसांकडे आहेत. (हेही वाचा -2 SUVs With Same Number Found In Delhi: दिल्लीतील ल्युटियन्समध्ये एकाच क्रमांकाच्या 2 एसयूव्ही आढळल्या; काय आहे प्रकरण? वाचा)
एकच नंबर प्लेट असलेल्या 2 कार, पहा व्हिडिओ -
मुंबई के ताज होटल में एक ही नंबर प्लेट वाली दो गाड़ियां मिलीं हैं. जो एक ही मॉडल की हैं. ये गाड़ियां होटल के अंदर संदिग्ध हालत में खड़ी पाई गईं. पुलिस इन गाड़ियों की जांच कर रही है.#Mumbai #TajHotel #Car #NumberPlate #ABPNews pic.twitter.com/mQfEogwxKB
— ABP News (@ABPNews) January 6, 2025
वाहनांचा तपास सुरू -
दरम्यान, या प्रकरणाचा तपास कुलाबा पोलीस करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या दोन्ही कारचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या चित्रात एकाच कंपनीची दोन वाहने आणि एकच नंबर प्लेट असलेली मॉडेल दिसत आहे. दोन्ही वाहने दिसायला सारखीच आहेत. चालान टाळण्यासाठी चालकाने नंबर प्लेट बदलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.