Dead Body | Pixabay.com

Government Railway Police अर्थात जीआरपी कॉस्टेबल 42 वर्षीय हेड कॉस्टेबलची नवी मुंबई मध्ये निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या याप्रकरणामध्ये दोघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. बुधवारी, 1 जानेवारीच्या पहाटे नवी मुंबईत रबाळे-घणसोली स्थानकादरम्यान त्याचा गळा दाबून त्याला चालत्या ट्रेनसमोर ढकलण्यात आल्याचे समोर आले आहे.

सिनीयर जीआरपी ऑफिसर ने दिलेल्या माहितीनुसार, मृत कॉन्स्टेबल चे नाव विजय रमेश चव्हाण आहे. त्यांच्या गळ्यावर गळा दाबल्याची खूण मिळाली आहे तसेच डोक्यालाही गंभीर जखमा आहेत. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, रेल्वेच्या मोटरमनने पोलिसांना सांगितले की, पहाटे 5.25 ते 5.32 च्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी चव्हाण यांना रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर ढकलले.

मोटरमनने रेल्वे कंट्रोलला याची सर्वात आधी माहिती दिली. नंतर रेल्वे पोलीस नियंत्रणाला दिली. वाशी रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. त्यांना चव्हाण हे दोन रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रुळाजवळ बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी त्याला तातडीने वाशी महापालिकेच्या रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे जीआरपी अधिकाऱ्याने सांगितल्याचं Indian Express च्या वृत्तात म्हटलं आहे.

पनवेल जीआरपीमध्ये तैनात असलेला चव्हाण हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून तो नवी मुंबईतील घणसोली गावातील चिंचाडी परिसरात राहत होता. ड्युटी वर नसलेले आणि साधे कपडे घातलेले चव्हाण हे दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

दोन आरोपींनी त्याला जास्त दारू पाजण्यास भाग पाडले आणि नंतर ही हत्या केल्याचा संशय आहे. रबाळे रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाच्या आवारात प्रवेश केला आणि नंतर त्याला लोकल ट्रेनसमोर फेकून दिले. आरोपी अज्ञात आहेत, आणि हेतू अस्पष्ट आहे, असे आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. नक्की वाचा: Navi Mumbai Firing: सानपाडा येथे डी मार्ट बाहेर गोळीबारात एक जण जखमी; पोलिसांचा तपास सुरू .

चव्हाण यांचा मोबाईल सापडला आहे. त्याने शेवटचा फोन कोणाला केला आणि शेवटच्या वेळी त्याच्यासोबत कोण होते हे जाणून घेण्यासाठी पोलिस त्याचे फोन कॉल्स तपासत आहेत.