Photo Credit- X

Navi Mumbai Firing: सानपाडा (Sanpada)परिसरात सकाळी झालेल्या गोळीबाराच्या (Shooting)घटनेने परिसर हादरून गेला आहे. बाईकवरून पाच ते सहा राऊंड गोळबार करून दोन आरोपी फरार झाले आहेत. सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. या गोळीबारात राजाराम ठोके नावाचा इसम जखमी (One injured) झाला आहे. भर दिवसा सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात गोळीबार घडल्यानं, नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.(Navi Mumbai Firing: सानपाडा येथे डी मार्ट परिसरात गोळीबार; पाच ते सहा राउंड फायर, पोलीस घटनास्थळी दाखल)

सानपाड्यातील डी मार्ट परिसर कायम वर्दळीचा असतो. अनेक लोक ये- जा करीत असतात. भर दिवसा हा गोळीबार घडल्यानंतर नागरीकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. गोळीबार करणारे दोन आरोपी होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दोन ते तीन गोळ्या राजाराम यांना लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोळीबारानंतर जखमी व्यक्तीला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नवी मुंबई गुन्हे शाखेचे डीसीपी अमित काळे यांनी सांगितले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेनंतर सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपी कुठल्या दिशेनं फरार झाले आहेत, या संदर्भातील सीसीटिव्ही फुटेज पोलीस तपासत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस आणि फॉरेन्सिक टीम करीत आहेत.