Maharashtra Assembly Elections 2019 TV9-Cicero Exit Poll Results Live Streaming: टीव्ही 9 मराठी आणि Cicero चा एक्झिट पोल इथे पहा लाईव्ह, मतदारांचा कौल यंदा कुणाच्या पारड्यात पडणार?
Vidhan Sabha Election Exit Poll 2019 (Photo Credits: File)

TV9 Exit Poll Results and Predictions 2019: आजपासून बरोबर महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर झाल्या आणि सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली ती निवडणुकांसाठी. निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आज एकाच टप्प्यात राज्यात विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली. येत्या 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा जागांसाठी ही मतदान प्रक्रिया झाली. या मतदानानुसार सर्व प्रसारमाध्यमे मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल (Exit Poll) दाखविण्यात येतो. यात निवडणुकीच्या अंतिम निकालाचं चित्र काय असेल? याचा अंदाज वर्तविण्यात येतो. TV9 -Cicero  कडून जाहीर करण्यात येणार्‍या एक्झिट पोलकडे तुमचे लक्ष असेल तर तो लाईव्ह कसा आणि कुठे पहायचा ? हे जाणून नक्की घ्या.

टीव्ही9 मराठी काही दिवसांपूर्वी नेता, सी व्होटर आणि जन की बात या तीन संस्थांचा ओपनियन पोल एकाच ठिकाणी, एकाच वेळी  प्रसारित केला. हा ओपिनियन पोल सर्वस्वी त्या संस्थांचा होता.

TV 9 एक्झिट पोल लाईव्ह कुठे पहाल?

टीव्ही 9 मराठी आणि Cicero यांनी मिळून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील पाच लाखांहून अधिक मतदारांचा सर्व्हे केला आहे.

येथे पाहा TV9 मराठी एक्झिट पोल

नेदरलँडमध्ये समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोल या संकल्पनेला सुरूवात केली. 15 फेब्रुवारी 1967 रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.

महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा, शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.