
महाराष्ट्रात अनेक भागामध्ये सध्या अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. तुळजापूर (Tuljapur) जिल्ह्याला देखील अवकाळीने झोडपून काढले आहे. या पावसातच काल आयशर टेम्पो (Eicher Tempo) चालकाला अंदाज न आल्याने त्याची गाडी नादुरुस्त उभ्या ट्रकवर आदळल्याची घटना समोर आली आहे. औसा-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील हा बेलकुंड येथील भीषण अपघात आहे. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या अपघाताचा सध्या तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना औसा -तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड जवळ रात्री आठच्या सुमारास घडली आहे. नक्की वाचा: Nitin Gadkari On Road Safety: रस्त्यांचे चुकीचे आराखडे अपघातास कारण; नितीन गडकरी यांचे अभियंत्यांवर खापर .
पावसामुळे अंदाज न आल्याने अपघात
तुळजापूर मध्ये औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड येथे रात्री बिघडलेल्या ट्रकला मागून आयशर टेम्पोने धडक दिली. आयशर टेम्पो मागून येणारी कार आयशर टेम्पोला धडकली. या अपघातामध्ये आयशर टेम्पोचा चालक आणि बिघडलेला ट्रक दुरूस्त करणारा मेकॅनिक जागीच ठार झाला आहे.
आयशरच्या पाठीमागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारणे अचानक झालेल्या घटनेमुळे वेळेवर ब्रेक न लागल्याने आयशरला पाठीमागून धडक दिली. कार मधील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
रात्री पाऊस बरसत असल्याने जखमींना हॉस्पिटल मध्ये पोहचवण्यामध्येही बर्याच अडचणी येत होत्या. मात्र पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने अपघातामधील जखमींना जवळच्या रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भादा पोलिस सध्या या अपघाताची चौकशी करत आहेत.