Fire | Pixabay.com

Bhiwandi Fire: भिवंडीत (Bhiwandi) दापोडे (Dapode) येथे केमिकलच्या ड्रम (Chemical Drums) ने भरलेल्या ट्रकला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रकला आग लागल्याचे समजताचं चालकाने ट्रकमधून उडी मारली. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार, या ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम होते. आग लावल्याने ट्रकमधील केमिकलच्या ड्रमनेही पेट घेतला. त्यानंतर एकामागून एक स्फोट होऊ लागले. स्फोट झाल्याने हे ड्रम ट्रकच्या बाहेर पडत होते. यातील एक ड्रम रस्त्यावरील चायनीजच्या दुकानावर पडला. परिणामी, या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. (हेही वाचा - Uran Local Train Soon: उरणकरांचे स्वप्न होणार पूर्ण; पार पडला लोकल रेल्वेचा ट्रायल रन, लवकरच सुरु होणार नियमित सेवा (Watch))

दापोडे परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना दिली. यानंतर नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावून घेतलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमातून ट्रकला लागलेली आग विझवण्यात यश आलं.

या संपूर्ण घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिवंडीत दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी वेळीचं उपाय शोधणं गरजेचं आहे. शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड गावात एका किराणा दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. यात 33 लाख रुपयांच्या साहित्यासह दीड लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली होती.