राज्यातील आयएएस (IAS Officer) दर्जाच्या काही अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्या आहेत. तर, काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश रद्द करुन त्या ठिकाणी दुसऱ्या अधकाऱ्याची नियुक्ती करण्या आली आहे. प्राप्त माहितीनुसार, नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची मुंबई जीवन प्राधिकरण विभागात बदली करण्यात आली होती. मात्र, आता मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करुन या ठिकाणी मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, एम. जे. प्रदीप चंद्र यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदाचा तर, ई रवींद्रन यांच्याकडे नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
दुसाऱ्या बाजूला राज्यातील इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्या आल्या आहेत. राज्यातील बदली करण्यात आलेले अधिकारी, त्यांची नावे आणि पदे खालील प्रमाणे. (हेही वाचा, ठाकरे सरकारने केल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती)
अधिकाऱ्यांचे नाव, सध्या कार्यरत असलेले पद आणि बदली झालेला विभाग (पदासह) | |||
अधिकाऱ्याचे नाव | सध्या कार्यरत | बदली झालेला विभाग | |
1 | अनिल डिग्गीकर | -- | नियुक्ती विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प मुंबई (रिक्त पद) |
2 | विवेक जॉन्सन | अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद | प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा, साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा |
3 | अमित सैनी | सहायक विक्रीकर आयुक्त मुंबई | नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ मुंबई |
4 | दीपक कुमार मीना | मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम | नियुक्ती जिल्हाधिकारी गोंदिया |
5 | एस. राममूर्ती | व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर | नियुक्ती जिल्हाधिकारी बुलढाणा |
6 | प्रशांत नारनवरे | -- | नियुक्ती आयुक्त समाजकल्याण कल्याण, पुणे |
दरम्यान, राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन विरोधी पक्ष काहीसा आक्रमक पाहायला मिळाला आहे. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्य सरकारवर टीका केली होती की, राज्यासमोर कोरोना व्हायरस संकट आहे. त्यामुळे एखाद्या वर्षी अधिकाऱ्यांच्या बदल्यानाही केल्या तर काय बिघडणार आहे. मात्र, राज्य सरकारने बदल्यांचा धंदा सुरु केला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.