Beed Train Accident: बीडमधील मलकापूर येथे काळजाचा थरकाप उडवणारा रेल्वे अपघात (Train Accident in Beed)झाला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू रेल्वेची धडक मेंढपाळासह (sheep death)त्याच्या जनावरांना बसली. अपघातात ते सर्व जागीच ठार झाले. यात त्याच्या 22 मेंढ्या आणि 2 जनावरे दगावली. ही दुर्दैवी घटना बीडच्या परळी शहरापासून जवळच असलेल्या मलकापूर शिवारात घडली. मुंजा ढोणे असं मृत मेंढपाळाचं नाव(shepherd death) आहे. (हेही वाचा:Three Dogs Died In Powai: विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत तीन श्वानांचा मृत्यू; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल)
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील धनगर गल्ली भागातील मेंढपाळ, मधुकर सरवदे व मुंजा ढोणे या दोघांनी आज मेंढ्या चारण्यासाठी सोडल्या होत्या. यावेळी रेल्वे पटरीवरू मेंढ्या जात होत्या. यावेळी परळी-हैद्राबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापूर शिवारानजीक अचानक समोरून मालगाडी आली.
मात्र दोन्ही बाजूंनी डोंगर असल्यामुळे बचावासाठी वेळचं मिळाला नाही. क्षणार्धात मालगाडीने 22 मेंढ्या आणि दोन जनावरांना चिरडलं. मेंढपाळ मुंजा ढोणे यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मधुकर सरवदे हे सुदैवाने यातून बचावले. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.