Three Dogs Died In Powai : रस्त्यावर फेकलेले विषारी अन्न खाल्याने पवईत (Powai) तीन श्वानांचा मृत्यू झाला आहे. तर, एका श्वानावर उपचार सुरू आहे. याबाबत पार्क साईट पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्राणी प्रेमींकडून (animal lover) संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्राणीप्रेमींनी या प्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी देखील केली आहे. हेही वाचा: Dog Crushed to Death in Pune Video: सोशल मीडीया इंफ्लुएंसर Prasad Nagarkar वर Lamborghini खाली कुत्र्याला चिरडल्याचा आरोप; FIR दाखल
पवईच्या सनसिटी सोसायटी (Suncity Society)परिसरातून शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली. या परिसरातील चार श्वानांनी रस्त्यावर फेकलेले अन्न खाल्ले होते. त्यानंतर ते चारही श्वान अत्यावस्थ अवस्थेत एका सोसायटीच्या आवारात पडले होते. दरम्यान, ही बाब तिथल्या सुरक्षारक्षकाच्या निरीक्षणात आली. त्याने ही माहिती तेथे राहणाऱ्या ट्रीजा टेकेकरा या महिलेला दिली. त्या महिलेने तात्काळ याबाबत पोलिसांना कळवले. हेही वाचा: Dog Hanged to Death in Maharashtra Video: जळगावात ट्रॅक्टरच्या सीटचे नुकसान करणाऱ्या भटक्या कुत्र्याची निर्दयीपणे हत्या, व्हिडीओ व्हायरल
त्यानुसार पार्कसाईट पोलीस ठाण्याचे काही पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने ट्रीजा टेकेकरा यांनी चार श्वानांना परेल येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यातील तीन श्वानांचा मृत्यू झाला होता. तर सुदैवाने जिवंत असलेल्या एका श्वानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पार्कसाईट पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या परिसरात नागरिक सर्रासपणे शिल्लक राहीलेले अन्नपदार्थ हे रस्त्याच्याकडेला टाकतात. खूप काळ अन्न हे तसेच राहिल्याने त्यात बॅक्टेरिया निर्माण होतो. विषारी जीवाणू तयार होतात. त्यामुळे जर कोणत्या प्राण्याने ते खाल्यास त्याचा विपरीत परिणाम त्या प्राण्यावर जाणवतो. काही वेळा यात त्यांचा मृत्यू होतो.