Maharashtra Police: गेल्या 24 तासांत 70 पोलिसांना COVID-19 ची लागण तर 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संक्रमित (COVID-19) रुग्णांच्या संख्येसोबत महाराष्ट्र पोलिसांमध्येही (Maharashtra Police) कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत 80 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 2 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे सद्य घडीला महाराष्ट्र पोलिसांमध्ये 1889 रुग्ण असून मृतांचा एकूण आकडा 20 वर पोहोचला आहे. तसेच 1031 पोलिस सध्या उपचार घेत असून 838 पोलिस बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलिस रात्रंदिवस एक करुन जनतेची सेवा करत आहे. कोरोनासह त्यांचे मोठे युद्ध सुरु असून हे युद्ध जिंकण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरलेल्या या कोविड योद्धांना झपाट्याने कोरोनाची लागण होत आहे. IPC 188 कलमांर्गत आतापर्यंत एकूण 1,15,263 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यात मुंबईत वगळता नियमांचे उल्लंघन करणा-या 695 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिसांवर हल्ला करणा-या 832 लोकांना अटक करण्यात आली आहे. यात 86 पोलीस जखमी झाले आहेत. आतापर्यंत 72,687 वाहने जप्त करण्यात आली आहेत. Coronavirus: कोरोना व्हायरस विरुद्धचा लढा यशस्वी जिंकल्यावर महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याने सांगितला अनुभव (Video)

सद्य घडीला महाराष्ट्रात एकूण 52,667 रुग्ण आढळले असून त्यातील 1695 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची सद्यची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमाचे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे.