Toll Rate Hike on National Highway: राष्ट्रीय महामार्गावर टोल दरवाढ, आजपासून नवे होणार लागू
Representational Image (Photo credits: PTI)

देशभरात फास्टॅग अनिवार्य झाल्यानंतर टोल संदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोल दरवाढ (Toll Price hike on National Highway) झाली असून ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. या महामार्गावरील टोलमध्ये 5% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्यानुसार प्रवास योजावा. शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे बेंगळुरू (Pune-Bengluru Highway) महामार्गासह नाशिक आणि सोलापूर महामार्गावरील टोलचे दर आज म्हणजेच 1 एप्रिलपासून वाढणार आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरवाढीमध्ये खेड शिवापूर, आणेवाडी, पाटस, सरडेवाडी, चाळकवाडी आणि हिवरगाव पावसा या टोल नाक्यावर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे.हेदेखील  वाचा- LPG Cylinder in India: एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांनी कपात, नवे दर आजपासून लागू

केंद्र सरकार महागाईच्या निर्देशंकानुसार, यापूर्वी 2019 मध्ये दरवाढ करण्यात आली होती. त्यानुसार, आजपासून पुणे-बेंगळुरू महामार्गावरील आणेवाडी आणि खेड-शिवापूर टोलनाका आणि पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा, चाळकवाडी आणि सोलापूर महामार्गावरील पाटस, सरडेवाडी या टोलनाक्यांवर 5% दरवाढ केली आहे.

खेड-शिवापूर टोलनाक्यावर कार, जीप आणि व्हॅन करता एकेरी प्रवासासाठी 100 रुपये तर दुहेरी प्रवासासाठी 150 रुपये आकारण्यात येणार आहे. तर ट्रक आणि बस साठी 340 आणि 505 रुपये आकारण्यात येणार आहे.

नाशिक महामार्गावर कार, जीप आणि व्हॅनसाठी एकेरी आणि दुहेरी प्रवासासाठी अनुक्रमे 45 आणि 70 रुपये मोजावे लागतील. तर आणेवाडी टोलनाक्यावर छोट्या चारचाकी वाहनांसाठी अनुक्रमे 70 आणि 105 रुपये मोजावे लागतील.