Tigress Avni (Photo Credit: Twitter/ Milind Deora)

अवनी वाघिणीच्या (Tigress Avni) हत्येनंतर अनेक आरोप -प्रत्यारोप रंगले. आज राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (National Tiger Conservation Authority ) यांनी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात अवनी वाघिणीला गोळी घालणं बेकायदेशीर असल्याचं मत व्यक्त करण्यात आले आहे. तसेच वाघिणीला मारण्यावरून असगर अली खान आणि वन कर्मचारी मुखबीर शेख यांच्यावर देखील ताशेरे ओढण्यात आले आहेत.

अवनीची शिकार नसून हत्या करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. अवनीला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला नाही, अवनीला ठार मारण्यापूर्वी बेशुद्ध करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. प्राण्याला ठार मारताना पशुवैद्यकीय अधिकारी सोबत असण गरजेचे आहे मात्र अवनीच्या शिकारीच्या वेळेस संबंधित अधिकारी नसताना शिकार झाल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. अवनीरुपी जनता 2019 मध्ये सरकारचा माज उतरवेल; राज ठाकरेंचे नवे व्यंगचित्र

2 नोव्हेंबर दिवशी यवतमाळ येथील पांढरकवडा परिसर नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आले. अवनी वाघिण 14 जणांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचं स्थानिकांचं मत आहे. त्यामुळे वनविभागाकडून अवनीची शिकार झाल्यानंतर गावकऱ्यांनी आनंदसोहळा साजरा केला होता. तर वन्यप्रेमींनी या प्रकरणी राग व्यक्त करत वनमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.