Kolhapur: सर्वत्र नव वर्षांच्या स्वागताच्या आगमनाची तयारी आनंदात सुरु आहे. वर्ष अखेर असल्याने अनेक जण बाहेर फिरण्यासाठी जात आहेत. कोल्हापुरातून दुर्देवी घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील चित्री नदी(Chitri River)मध्ये पोहायला (Swimming)गेलेल्या तिघ मित्रांचा मदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील आजरा (Ajra) येथे ही घटना घडली आहे. तिघांच्या परिसरात गावावर शोककळा पसरली आहे. कोल्हापूरातून ही घटना रविवारी समोर आली आहे. या घटनेची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. रुझारीओ अंतोन कुतिन्हो (वय 40), फिलीप अंतोन कुतिन्हो (वय 36) आणि लॉईड पास्कोन कुतिन्हो (वय 30) अशी त्यांची नावे आहेत. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. ही घटना समजताच कासारकांडगाव येथील ग्रामस्थांनी बंधाऱ्य़ाकडे धाव घेत शोधमोहीम सुरू केली. बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. आजरा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.