अमरावती (Amravati) जिल्ह्यातील 3 मुलांसह आईचाही चंद्रभागा नदीत (Chandrabhaga River) बुडून मृत्यू झाला आहे. तर, या चौघांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य दोन महिलादेखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज येथे घडली आहे. संबंधित महिला आपल्या मुलांसह तिन्ही मुले एकादशी निमित्त पूजा केलेले साहित्य नदीत अर्पण करायला गेले होती. त्यावेळी तिन्ही मुले अंघोळीसाठी पाण्यात उतरली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही नदीत बुडाली. त्यावेळी त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची आई उरतली. परंतु, दुर्देवाने चौघांचाही बडून मृत्यू झाला आहे.
यश चवरे (13), जीवन चवरे(14), सोहम झेले (12), पुष्पा चवरे अशी मृत माय लेकरांची नावे आहेत. पुष्पा या आपल्या मुलांसोबत गावाशेजारच्या नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी तिन्ही मुले अंघोळीसाठी नदी पात्रात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेली आणि नदी पात्रातील खड्ड्यामध्ये बुडाली. त्यांना वाचविण्यासाठी पुष्पा चवरे या नदी पात्रात उतरल्या, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला. तर त्यावेळी बुडणाऱ्या या चौघांना वाचविण्याच्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या. मात्र, या प्रयत्नात त्यादेखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Kidnapping And Selling Case: अंबरनाथ येथे अडीच वर्षीय मुलाचे अपहरण करून चक्क 70 हजारांना विकले; एका महिलेसह 5 जणांना अटक
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. नरखेड तालुक्यातील जंगलात मच्छी तलाव आहे. या तलावात पोहोण्याचा मोह या दोन शालेय विद्यार्थ्यांना आवरता आला नाही आणि ते दोघेही तलावात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता.