Bhiwandi: खळबळजनक! भिवंडीत एकतर्फी प्रेमातून तरूणीचे चाकून कापले ओठ; शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Representational Image | (Photo Credits: PTI)

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना भिंवडी (Bhiwandi) येथील एका तरूणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या परिसरात एका विकृत तरूणाने एकतर्फी प्रेमातून तरूणीचे ओठ कापल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या एका मित्रावर शांतीनगर पोलीस ठाण्यात (Shantinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात पीडित तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर मुंबईच्या (Mumbai) केईएम रुग्णालयात (KEM Hospital) उपचार सुरु आहे.

मुक्तार अब्दुल रहीम अंसारी (वय, 23) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरूणीसोबत एकतर्फी प्रेम होते. आरोपीने अनेकदा तिच्याकडे आपल्या प्रेमाची विचारणा करत होता. परंतु, पीडिताचा या प्रेमाला विरोध होता. आपल्या प्रेमाला विरोध करते म्हणून आरोपीने पीडिताला अनेक धमक्या देखील दिल्या होत्या. 'तू मेरी नही हुई तो मै तुझे किसी और के लायक नही छोडूंगा' अशी धमकी देखील या विकृत तरुणाने पीडित मुलीला दिली होती. दरम्यान, 9 एप्रिल रोजी पीडित महिला सकाळी घराबाहेर पडली असताना आरोपीने आपल्या मित्रासह तिला गाठले. तसेच आरोपीने तिच्या तोंडावरचा नकाब काढून साथीदाराच्या मदतीने पीडिताचे ओठ कापले. हे देखील वाचा- उत्तर आणि पूर्व भारतामध्ये अधिक समर स्पेशल ट्रेन्स येत्या काही काळात सुरू केल्या जातील प्रवाशांनी घाबरून स्थानकांमध्ये गर्दी करू नये - CPRO शिवाजी सुतार

याआधी एक आठवड्यापूर्वी हडपसरजवळी काळेपडळमधील नेहरू पार्क गल्लीमध्ये अशीच एक घटना घडली होती. प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरून तरूणीच्या वडिलांवर कोयत्याने वार करीत खुनाचा प्रयत्न केला होता. याशिवाय, तरूणीसह तिच्या बहिणीलाही मारहाण केल्याची घटना घडली होती.