जळगाव येथील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर; जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1000 पार
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबई परिसरात आढळून आले आहेत. आता जळगाव (Jalgaon) येथेही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. जळगाव येथे आज आणखी 44 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1001 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्येने 80 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यापैकी 35 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात एकूण 42 हजार एक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- 'निसर्ग' चक्रीवादळामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटींची केलेली मदत फारच तोकडी- देवेंद्र फडणवीस

ट्वीट-

कोविड-19 च्या उपचारासाठी महाराष्ट्र सरकार Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. कोरोना व्हायरसच्या उपचारात याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेनेसुचविले आहे. तसेच MERS- CoV आणि SARS या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजारात या औषधाचे आशादायी परिणाम दिसून आल्याचे प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे औषध अत्यंत महान असल्याने गरिबांच्या सोयीसाठी राज्य सरकार याची खरेदी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.