Pune Police | (Photo Credits: ANI)

पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) गणेश मंडळांकडून (Ganesh Mandal) विसर्जन मिरवणुकीसाठी मेट्रो पूल (Metro Bridge) असलेल्या मार्गांवरून काढण्यात येणाऱ्या रथांच्या उंचीवर निर्बंध लादले आहेत.

डेक्कन पोलीस ठाण्याचे (Deccan Police Stations) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डेक्कन कॉर्नर येथील लकडी पुलजवळील मेट्रो पुलाची उंची 21 फूट आहे. त्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या गणेश मंडळांनी आपल्या रथांची उंची 18 फुटांपेक्षा जास्त नसावी याची काळजी घ्यावी, असेही कर्पे यांनी सांगितले. हेही वाचा Thane Gangrape Case: ठाण्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये मर्चंट नेव्हीचा कर्मचारी आणि हिस्ट्रीशीटरचा समावेश

कर्वे रस्त्यावरील गरवारे कॉलेज येथील मेट्रो स्थानकाची उंची 18 फूट आहे, तर नल स्टॉप जंक्शनवरील मेट्रो ओव्हर ब्रिजची उंची 17 फूट आहे. या दोन विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांनी त्यांच्या रथांची उंची 16 फुटांपेक्षा कमी ठेवावी.कर्वे रोड मेट्रो ब्राइडच्या आजूबाजूच्या दोन्ही सर्व्हिस रोडची लांबी 15 फूट असून या मार्गावरून जाणार्‍या गणेश मंडळांनी त्यांच्या रथांची लांबी 12 फूटांपेक्षा कमी आहे हे पाहावे. यंदा 30ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे.