Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

मुंबईतील शिवाजीनगर (Shivajinagar) भागात एकाच घरात चार कुटुंबीयांचे मृतदेह (Deadbody) आढळून आले आहेत. चारपैकी दोन मृतदेह लहान मुलांचे आहेत. या चौघांचे मृतदेह शिवाजी नगर येथील गोवंडीजवळील (Govandi) बैंगणवाडी (Bainganwadi) परिसरात आढळून आले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  गोवंडीच्या बैंगणवाडीत यापूर्वीही अशी घटना घडली आहे. आतापर्यंत सापडलेल्या चार मृतदेहांपैकी दोन बालके आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली आहे. तेथून गर्दी हटवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी चेंबूरच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

अद्याप पोलिसांनी मृतांची ओळख जाहीर केलेली नाही. एकाच घरातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यूमागचे कारण पोलीस शोधत आहेत. दरम्यान, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळावरून पुरावे शोधण्यात आणि ओळख पटवण्यात गुंतले आहेत. वस्तीतील लोकांशी संबंधित कुटुंबाची चौकशी करण्याचे काम सुरू आहे.  पोलीस घटनास्थळी उपस्थित असलेल्या संशयास्पद वस्तू ताब्यात घेत आहेत.

शिवाजी नगर पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील चेंबूर येथील शताब्दी रुग्णालयात पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.  शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळेच याबाबत अधिक माहिती देण्यास पोलीस सध्या नकार देत आहेत. मृतांची ओळखही जाहीर करण्यात आलेली नाही. हेही वाचा Nagpur Gangrape Case: उमरेड मध्ये 11 वर्षीय मुलीवर महिनाभर सामुहिक बलात्कार, 9 जण अटकेत; खूनाच्या तपासात मुख्य आरोपीचं उघड झालं कृष्णकृत्य

ही बातमी समोर येताच आगीसारखी पसरत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वी पोलीस अधिक खबरदारी घेत आहेत. पोलिसांनी अद्याप मृतांची नावे उघड केलेली नाहीत आणि आणखी कोणतीही ओळख जाहीर केलेली नाही. मात्र ही बातमी झपाट्याने पसरल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली आहे. त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पोलिसांच्या कारवाईत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून अतिरिक्त पोलिस पथके घटनास्थळी पाचारण करण्यात आली आहेत.